महाराष्ट्रातील महाविद्यालय 15 फेब्रुवारी पासून उघडणार

महाराष्ट्रातील महाविद्यालय 15 फेब्रुवारी पासून उघडणार


महाराष्ट्रातील महाविद्यालय 15 फेब्रुवारी पासून उघडणार 

महाराष्ट्रातील राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यातील सर्व महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून  उघडणार.  महाविद्यालय उघडण्याचा निर्णय उच्च  व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत यांनी घेतला.  युनिव्हर्सिटी ला काही गाईडलाईन्स च्या आधारे कॉलेजेस सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य सरकारने दिली.  याबाबतीत उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी सविस्तरपणे सांगितली कि कॉलेजेस 15 फेब्रुवारीनंतर सुरू करावेत. 


राज्यातील शाळा सुरू केल्यानंतरचा हा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला.  राज्यातील  शाळा ह्या जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या होत्या परंतु अजूनही राज्यातील महाविद्यालय चालू झालेली नव्हती,  त्यामुळे सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी शिक्षण मंत्र्यांकडे  कॉलेज सुरू करण्यासाठी मागील महिन्यापासून प्रयत्न सुरू केले होते.  या सर्व गोष्टी नंतर  उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी आज कॉलेज 15 फेब्रुवारी 2019 पासून पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली. 


यापूर्वीही महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 4  जानेवारी रोजी घेतला होता परंतु काही  अडचणीमुळे युनिव्हर्सिटीने किंवा यूजीसीने तो निर्णय मागे घेतला.  आणि आता 15 फेब्रुवारी पासून कॉलेजेस  उघडण्यासाठी परवानगी दिली.  लवकरच युनिव्हर्सिटी महाविद्यालय कशी सुरु करावीत याबाबत देखील सर्व प्रकारच्या सूचना कॉलेजेसना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देईल. 


75 टक्के अटेंडन्स कम्पल्सरी नाही 


महाविद्यालय जरी सुरू झाले असले तरी त्यात काही गोष्टींना धरून चालावे लागणार आहे.  जसे की वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी काही वेगळ्या सुविधा करण्यात याव्यात त्याप्रमाणे दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  काहीतरी सोय करावी म्हणून  कॉलेजमधील अटेंडन्स ही कंपल्सरी 75% राहणार नाही असा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतला. त्याचप्रमाणे परीक्षांच्या बाबतीत देखील दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय उपलब्ध असावेत असा सल्ला शिक्षणमंत्र्यांनी  विद्यापीठांना दिला. 


अजून दोन दिवसांमध्ये या बद्दलची सविस्तर माहिती आपल्याला समजेल.  आता संपूर्ण गोष्टी या  युनिव्हर्सिटी च्या हातात असल्यामुळे  परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येतील,  त्या कुठे घेण्यात येतील  आणि प्रात्यक्षिकं बद्दलचे काय ही सर्व माहिती यूनिवर्सिटी विद्यार्थ्यांना कळवणार आहे.  विद्यार्थ्यांचे असेही मागणी आहे की होणाऱ्या परीक्षांमध्ये सिलॅबस हा थोड्याफार प्रमाणात कमी करण्यात यावा.



परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन ? 


विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार प्रथम सत्राच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात.  संपूर्ण सिल्याबस हा ऑनलाइन पद्धतीने शिकल्यामुळे विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की परीक्षादेखील ऑनलाईनच घ्याव्यात.  यावर आता युनिव्हर्सिटी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


याचबरोबर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे देखील प्रथम सत्र सुरू झालेले आहे.  बऱ्याच कॉलेजेस मधून विद्यार्थ्यांना ऑनलाइन  शिक्षण देण्यात येत आहे.  प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यांमध्ये अंतर पडू नये म्हणून हा निर्णय  कॉलेजने घेतलेला आहे.  जर तुम्हाला तुमचे मत याविषयी मांडायचे असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला  कळवू शकता. 



राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आणि सविस्तर वाचण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.  आम्ही नेहमीप्रमाणे अशाच प्रकारच्या विविध बातम्या टाकत असतो.  शिक्षण विषयक आणि का कॉलेजच्या त्याचप्रमाणे शाळांच्या विविध बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 




महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने आज निर्णय घेतला की विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत.  यामध्ये त्यांनी एक सर्क्युलर पाठवलेले आहे त्यात सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा नुसार हा निर्णय घेतलेला  असून याबाबतची सर्व माहिती एम एस बी टी ने कळवलेले आहे. 


महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने आज निर्णय घेतला की विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहेत.  यामध्ये त्यांनी एक सर्क्युलर पाठवलेले आहे त्यात सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा नुसार हा निर्णय घेतलेला  असून याबाबतची सर्व माहिती एम एस बी टी ने कळवलेले आहे. 

Leave a Comment

x