म्यूकोरमायकोसिस काय आहे – Mukermicosis In Marathi Symptoms

म्यूकोरमायकोसिस काय आहे मराठीमध्ये जाणून घ्या

म्यूकोरमायकोसिस हा एक बुरशीमुळे होणारा संसर्ग आहे त्याचप्रमाणे याला ब्लॅक फंगस असेही संबोधले जाते. काही दिवसांपासून काही आढळून आले आहे की म्यूकोरमायकोसिस हा संसर्ग करण्यातून बऱ्याच कोरोना झालेल्या रुग्णांना होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

भरपूर विविध प्रकारात असे आढळून आले की या आजारामुळे डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे तसेच कित्येक लोकांची दृष्टी देखील गेली आहे.  यामध्ये रुग्णाला नाक डोळे आणि डोकेदुखीचा त्रास होतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

म्यूकोरमायकोसिस  का होतो?

असे बघण्यात आले आहे की ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि नुकतेच कोरोना तून बरे झालेले आहेत त्यांना हा आजार होत आहे. कोरोना रुग्णाला ऑक्सीजन सिलेंडर द्वारी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो हा बाहेरून देण्यात येणारा ऑक्सीजन कोरडा असतो आणि त्यामुळे तो फुफ्फुसांच्या आत मधील पातळ भागाला इज्जत करू शकतो हि होणारी इजा रोखण्यासाठी ऑक्सिजनचा ला एका नळीच्या स्वरूपाने आर्द्र केला जातो.  हे सर्व कार्य होत असताना त्या पाण्याच्या नळीत अतिशय स्वच्छ पाणी भरावे लागत परंतु वाढत्या रुग्ण संख्येमुळे विविध ठिकाणी याची काळजी घेतली जात नाही त्यामुळे बुरशी समान असलेला हा म्यूकोरमायकोसिस  शरीरात प्रवेश करतो आणि रुग्णाला हा आजार होतो.

साधारणतः ज्या रुग्णांना मधुमेह आहे आणि  करुणा संक्रमित आहेत त्यांमध्ये या आजाराची लक्षणे आढळत आहेत. महाराष्ट्रात जवळपास दोनशेच्यावर पेशंट या आजाराची सापडलेले आहेत.  परंतु ज्यांना करून झाला आहे त्या प्रत्येकालाच हा आजार होईल असे नाही. 


म्यूकोरमायकोसिस काय आहे - Mukermicosis In Marathi Symptoms


म्यूकोरमायकोसिस ची लक्षणे काय आहेत 

  • जास्त प्रमाणात डोकेदुखी
  • डोळे दुखणे/  डोळ्यांना सूज येणे
  • नाकातून सराव बाहेर पडणे 
  • नाकाच्या हाडाला सूज येणे

साधारणतः ही काही लक्षणे म्यूकोरमायकोसिस  साठी ओळखले जातात असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.  यामध्ये डोळ्याच्या आत मधला भाग लालबुंद होऊन जाणे हे देखिल आढळून येते.  यामध्ये कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना विशिष्ट काळजी घेण्याची गरज आहे आणि जर तुम्ही या अगोदरच करून संक्रमित झालेली असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घ्या.

म्यूकोरमायकोसिस या आजारावर उपचार काय

सध्या म्यूकोरमायकोसिस  रुग्ण संख्या कमी असल्यामुळे  रुग्णाला आवश्यक ते उपचार देण्यात यावेत  यासाठी डोळ्यांची तज्ञ याची खास दखल घेत आहेत.  यामध्ये आधी ही बुरशी कितपत पसरलेली आहे याचे निदान करण्यात येते आणि त्यानुसार पुढील उपचाराचा मार्ग ठरतो.

काही केसेस मध्ये रुग्णाच्या म्यूकोरमायकोसिस  बुरशी असलेल्या भागात  शस्त्रक्रिया करून ती काढावी लागते तसेच जर ही बुरशी हाडांमध्ये पोहोचली असेल तर ते हा देखील काढून टाकण्यात येते. सध्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे विविध डॉक्टर लक्षपूर्वक या आजाराची पाहणी करत आहेत आणि रुग्ण देखील यातून बरे होत आहेत.  यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजेच आपापली काळजी घेऊन घरीच राहणे यामुळे तुमचा आणि तुमच्या परिवारास  कोरोना पासून देखील बचाव होईल.

Mukermicosis In Marathi Symptoms and Explanations

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात सर्व गोष्टींचा समावेश करा.  फळे पालेभाज्या दूध अंडी  इत्यादी सकस आहार घ्या.  तसेच नियमितपणे व्यायाम देखील करा.  जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा बद्दल समस्या असेल तर तुम्ही प्राणायाम देखील करू शकतात.  आम्ही लवकरच विविध प्रकारच्या प्राणायाम आणि योगाबद्दल लेख टाकणार आहोत जर तुम्हाला ते वाचायचे असतील तर आम्हाला फॉलो करा. 


Leave a Comment

x