रस्त्यावर पडला 2000 च्या नोटांचा खच अन् झाली अशी गर्दी !

वसई : चक्क 2 हजार रुपयांच्या नोटांचा ‘पाऊस पडला आहे.वसईच्या मधूबन परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर २ हजाराच्या नोटांचा पडलेला खच पाहुन सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते.मात्र या नोटा खोटा असल्याचं स्पष्ट झालं.

वसईच्या मधूबन परिसरात रस्त्यावर पडलेला नोटांचा खच पाहुन लहान मुलं आणि काही नागरिकांनी या नोटा जमा करण्याचाही प्रयत्न केला.मात्र नोटा उचलुन पाहिल्या,तेव्हा त्या डुप्लिकेट असल्याचं समजलं आणि सर्वांचाच हिरमोड झाला.

वसई पुर्व भागातील मधुबन परिसरात दूपारच्या सुमारास सन्नी नावाच्या वेब सीरीजची शूटिंग होती.चित्रिकरणाच्या वेळी 2 हजार रुपयांच्या खोट्या नोटांचा वापर करण्यात आला होता.शुटिंग संपल्यानंतर रस्त्यावर डुप्लिकेट नोटांचा खच पाहुन आजूबाजुच्या लोकांसह लहान मुलांनी देखील नोटा पाहण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी तुफान गर्दी केल्याचं पहायला मिळालं.

Leave a Comment

x