‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन

 मुंबई : रामानंद सागर यांच्या सन १९८६ ते १९८८ च्या दरम्यान दूरदर्शनवर प्रचंड गाजलेल्या ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले.ते ८२ वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री मुंबईत अखेरचा श्वास घेतला.बराच काळ ते आजारी होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. आज बुधवारी त्यांच्यावर डहाणूकरवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे निधन

एकेकाळी देशात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेबरोबरच विक्रम-वेताळ मालिकेतील त्यांची भूमिका लोकप्रिय राहिली. मात्र आजही भारतीय मनावर रावणाच्या व्यक्तित्वाचं अधिराज्य केले ते अरविंद त्रिवेदी यांच्या रावणाच्या व्यक्तिरेखेने! रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा होता. मोठा शिवभक्त होता. शिव आराधनेने त्याला मोठी सिद्धी प्राप्त होती. मात्र दुराचार हा नेहमी वैभव,प्रतिष्ठा हिरावून घेत असतो. रामायणातील कथानकात रावणाची ही प्रतिमा अधोरेखित करताना अरविंद त्रिवेदी कुठेही कमी पडले नाहीत. मांडीवर हात मारून त्यांनी रावणाची वैभव-ताकदीची गुर्मी लीलया साकारली होती

रामायण मालिकेतील सर्वच पात्रे त्याकाळी विशेष गाजली आणि चर्चेत राहिली. मात्र नकारात्मक भूमिका असताना आणि एक नकारात्मक धार्मिक भावना भारतीय मनात असताना अरविंद त्रिवेदी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले.

Leave a Comment

x