आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आपली संपत्ती, धनाबद्दल प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात? याबद्दल माहिती पाहूयात…
1. कुंकू : आजच्या दिवशी कुंकू खरेदी करा. हे देवी लक्ष्मीला वाहून स्वतःला देखील लावा. अशाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.
2. लक्ष्मीची पाऊले : आजच्या दिवशी लक्ष्मीची पाऊले खरेदी करा. ती घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ठेवा. लक्ष्मीच्या पावलांची आरती करा. देवीला घरी वास करण्यासाठी प्रार्थना देखील करा.
3. दिवा : आज एक दिवा खरेदी करा आणि रात्रीचे जेवण झाल्यावर दक्षिण दिशेला तो दिवा लावा. परंतु दिवा लावल्यावर त्याकडे मागे वळून पाहू नका. हा दिवा अकाली मृत्युपासून संरक्षण देतो असे मानले जाते.
4. अख्खे धने : आज धनत्रयोदशीला अख्खे धने खरेदी करा. मग ते देवी लक्ष्मी आणि धन्वंतरीला अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मी व धन्वंतरीसमोर तुपाचा दिवा लावून आरती करा. यानंतर धने प्रसादरूपी धने सर्वांना वाटा.
5. धने आणि बत्तासे : आजच्या दिवशी धने, दिवा, लक्ष्मीची पाउले, कुंकू तसेच बत्तासे खरेदी करणे महत्वाचे आहे. हा देवी लक्ष्मीचा आवडता प्रसाद आहे. बत्तासा नेहमी पांढरा घ्या. मग तो लक्ष्मी देवीला अर्पण करा. तसेच आयुष्यभर लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून प्रार्थना करा.
from Parner Darshan https://ift.tt/3pVXf6n